भारतातील आघाडीच्या प्रवासी वाहन आणि दुचाकी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या निर्मिती प्रकल्पांमध्ये कपात करण्याची किंवा उत्पादन थांबवण्याची घोषणा केली आहे. चालू तिमाहीतच हा निर्णय अंमलात आणला जाणार असून त्याचा कालावधी अनेक दिवसांचा असू शकतो. यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना आधीच उत्पादित करण्यात आलेल्या कार किंवा दुचाकींची थंडावलेल्या बाजारपेठेत विक्री करता येणार आहे. 
 
कारण अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांकडे वाहनांची इन्व्हेन्ट्री (अतिरिक्त वाहने) तयार झाली आहे. मात्र या उत्पादन कपातीचा मोठाच फटका कंपन्यांच्या कामगिरीवर होणार आहे. ऑटोमोबाईल कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या आणि वाढीचे उद्दिष्ट गाठणे त्यामुळे अवघड होऊन बसणार आहे. बाजारात आलेल्या मंदीमुळे जून महिन्याच्या सुरूवातीलाच देशातील तब्बल 35,000 कोटी रुपयांच्या मूल्याची वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. दुचाकी वाहनांच्या क्षेत्रात हा फटका अधिक असून तब्बल 2.5 अब्ज किंमतीची 30 लाख दुचाकी वाहने विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत. 

अभिप्राय द्या!

Close Menu