गुंतवणुकीची माहिती सुरक्षित राहावी, तसेच गुंतवणूकदाराच्या कुटुंबीयांना त्याबाबत माहिती मिळावी म्हणून इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड नावाचे ऍप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. व्हर्च्युअल तिजोरीवर आधारित असलेले अशाप्रकारचे देशातील हे पहिलेच अॅप आहे.
 
भारतात सुमारे ६४ बँकांमध्ये ११ हजार ४०० कोटी रुपये दाव्यांशिवाय पडून आहे. बऱ्याचदा कुटुंबीयांना घरातील कर्त्या व्यक्तींने कुठे गुंतवणूक केली आहे याची माहिती नसते. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून गुंतवणुकीबाबत माहिती सुरक्षित ठेवली जाईल शिवाय गरजेच्यावेळी गुंतवणुकीचा तपशील कुटुंबीयांना उपलब्ध करून दिला जाईल, अशा संकल्पनेतून अॅपची  निर्मिती केल्याचे संदीप सानप यांनी सांगितले. 
 
ऍपमध्ये प्रोफाइल तयार केल्यानंतर त्यात वित्तीय तपशील सेव्ह करता येतो. गुंतवणुकीचा तपशील एन्क्रिप्ट केल्यानंतर सर्व्हरवरवर पाठविला जातो. त्यामुळे संबंधित तपशील फक्त ऍप वापरत असलेल्या आणि त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तींनाच उपलब्ध होऊ शकतो,

अभिप्राय द्या!