राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) जेट एअरवेज लि. च्या शेअरच्या रोजच्या ट्रेडिंगला मनाई केली आहे. जेट एअरवेज एप्रिल महिन्यात बंद पडल्यापासून कंपनीच्या शेअरमध्ये सतत घसरणच होते आहे. कंपनीच्या शेअरचे मूल्य निम्म्यापेक्षा जास्तने कमी झाले आहे. जेट एअरवेज थकित कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडणार कि नाही यासंबंधी अनेक अफवा सध्या बाजारात येत आहेत. त्याचा विपरित परिणाम कंपनीच्या शेअरच्या किंमतीवर होतो आहे.
जेट एअरवेज बंद पडण्यापूर्वी भारतातील सर्वात मोठी खासगी विमानसेवा कंपनी होती. मात्र कर्जाचा विळखा वाढतच गेल्याने तसेच जेटकडे रोकडचा अभाव असल्याने कंपनीला दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे अशक्य झाले होते. त्यामुळेच कंपनीच्या व्यवस्थापनाने एप्रिल महिन्यात जेट एअरवेजचे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
एप्रिल महिन्यात 264 रुपये प्रति शेअरवर असणारा जेट एअरवेजचा शेअर आता 90.75 रुपये प्रति शेअर या किंमतीवर घसरला आहे. जेटचे शेअर आता विशिष्ट श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहेत. 28 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu