क्रेडिट कार्डाचे फायदे अनेक आहेत. क्रेडिट कार्डे पेमेंटच्या बाबतीत लवचिक असल्याने कार्डधारकाला आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. कार्डधारकाला मोठ्या रकमांची खरेदी किंवा क्रेडिट कार्डाचे थकलेले संपूर्ण बिल सोयीस्कर ईएमआयमध्ये रूपांतरित करता येऊ शकते व विशिष्ट कालावधीमध्ये त्याची फेड करता येऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच, कार्डधारकांना डेबिट कार्डांच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून अधिक रिवॉर्ड पॉइंट मिळवता येऊ शकतात. हे रिवॉर्ड पॉइंट कॅटलॉग, व्हाउचर, विमानाची तिकिटे, मूव्ही ऑफर यासाठी वापरता येऊ शकतात. 
 
उत्तम क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली तर चांगला क्रेडिट तयार करण्यासाठी मदत होते व त्यामुळे कर्ज घेताना सोयीचे होते.
 
क्रेडिट कार्डविषयी काही समज पुढील आहेत.
 
डेबिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही?
आपल्याकडे डेबिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डची गरज नाही, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु, अगोदर स्पष्ट केल्याप्रमाणे, क्रेडिट कार्ड पेमेंटच्या बाबतीत अतिशय लवचिक असतात आणि त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते. याचबरोबर, ग्राहकांना डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून अधिक रिवॉर्ड्स मिळवता येऊ शकतात. 
 
क्रेडिट कार्ड हिस्ट्रीचा परिणाम भविष्यातील कर्जांवर होईल का?
क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरल्यास भविष्यातील कर्जांसाठी आवश्यक असणारी क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी मदत होते. कार्डधारकाने मिनिमम अमाउंट ड्यू इतके किंवा त्याहून अधिक पैसे अंतिम मुदतीच्या दिवशी वा त्या आधी भरल्यास क्रेडिट ब्युरो हिस्ट्रीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. पैसे न भरणे किंवा उशिरा भरणे मात्र क्रेडिट ब्युरो हिस्ट्रीवर दुष्परिणाम करू शकते. 
 
परतफेड 
क्रेडिट कार्डधारकांसाठी परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध असतात – चेक, नेट बँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी. कार्डधारकांना वेळेवर पेमेंट करण्याची खबरदारी घेण्यासाठीही विविध मार्ग अवलंबता येतील, जसे पेमेंटच्या अंतिम मुदतीच्या दिवशी थेट कार्डधारकाच्या खात्यातून आपोआप टोटल ड्यू किंवा मिनिमम ड्यू रक्कम वळती होण्यासाठी ऑटो-डेबिट / NACH.
 
ग्राहकांच्या विविध गरजा व खर्चाच्या सवयी यांना सेवा देण्यासाठी बाजारात विविध प्रकारची क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी, एअरलाइन माइल्स, हॉटेल लॉयल्टी किंवा एअरपोर्ट लाउंज अशा सुविधा देणारे क्रेडिट कार्ड मिळेल. तसेच, बाहेर जेवण्याची किंवा खरेदीची आवड असणाऱ्यांसाठी सवलती, कुपन, रिवॉर्ड, व्हाउटर देणारे क्रेडिट कार्ड योग्य ठरते. त्यामुळे, आपल्या खर्चाच्या पद्धतीनुसार 2 – 3 क्रेडिट कार्ड खरेदी करता येऊ शकतात.  
 
क्रेडिट कार्ड स्मार्टपणे वापरण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा:
तुमची क्रेडिट मर्यादा जाणून घ्या
क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरा 
क्रेडिट तपशील सुरक्षित ठेवा 
खर्चावर लक्ष ठेवा
 
डेबिट कार्डांच्या तुलनेत, क्रेडिट कार्ड वर्षभर विविध लाभ देते आणि पेमेंटच्या बाबतीत लवचिकताही देते.  थोडी आर्थिक शिस्त पाळल्यास, क्रेडिट कार्ड हे कार्डधारकासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.

अभिप्राय द्या!