उद्योग विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टाटा ट्रस्टचे माजी संचालक (मॅनेजिंग ट्रस्टी), रामचंद्रन वेंकटरामन मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले आहेत. गुरुवारी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पदभार सांभाळला आहे. कधीकाळी आर वेंकटरामन हे टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू लोकांपैकी एक समजले जात असत.
मात्र फेब्रुवारी 2019 मध्ये वेंकटरामन यांनी टाटा ट्रस्टमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. वेंकटरामन रिलायन्स इंडस्ट्रीजमधील सामाजिक उपक्रम, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील उपक्रमांची जबाबदारी सांभाळणार आहेत. 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये रिलायन्सने रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांवर 770 कोटी रुपये खर्च केले आहे. वेंकटरामन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सामाजिक उपक्रमांना मोठीच चालना देतील अशी अपेक्षा आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu