कोटक अॅसेट मॅनेजमेंट कंपनीने (एएमसी) आपला नवा फंड, कोटक फोकस्ड इक्विटी फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे लार्ज-कॅप, स्मॉल-कॅप, मिड-कॅप श्रेणीतील एकत्रितरित्या 30 शेअरमध्ये (कमाल) गुंतवणूक करण्यात येणार आहे.
नव्या फंडाची ऑफर (एनएफओ) 25 जूनला गुंतवणूकीसाठी खुली होत असून 9 जुलै ही त्याची अंतिम तारीख आहे. या फंडाचा बेंचमार्क निफ्टी 200 टीआरआय असणार आहे. नव्या ‘कोटक फोकस्ड इक्विटी फंड’चे व्यवस्थापन शिबानी कुरियन आणि हरीश कृष्णन करणार आहेत.
‘कोटक फोकस्ड इक्विटी फंडद्वारे जोखीम आणि परतावा तत्वावर गुंतवणूक करण्यात येणार आहे. या फंडासाठी शेअर निवडताना बॉटम अप पद्धती अवलंबण्यात येणार आहे. कंपनीचा व्यवसाय, व्यवस्थापन आणि मूल्यांकन या मॉडेलवर आधारलेली गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंपन्यांची रोकड उपलब्धता आणि पीई रेशो या बाबीसुद्धा लक्षात घेतल्या जाणार असल्याचे’, मत कोटक म्युच्युअल फंडाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आणि इक्विटी संशोधन विभागाच्या प्रमुख शिबानी कुरियन यांनी व्यक्त केले आहे.
दिर्घकालीन उद्दिष्ट लक्षात घेऊन या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाणार आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेतील विकासाच्या संधीचा लाभ घेत दिर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड योग्य असल्याचे कोटक म्युच्युअल फंडाचे म्हणणे आहे. या फंडाचा पोर्टफोलिओ मल्टिकॅप प्रकारचा असणार आहे.

अभिप्राय द्या!