संतुलन — बॅलन्स्ड फंड
कोठेही कोणत्याही माणसाचा जीवनात परिपूर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न असतो.
कामाच्या ठिकाणी संतुलित वातावरण, नातेसंबंधात संतुलन जसे आवश्यक तसे, आपल्या कष्टाचा पैसा जेथे गुंतवतो तेथे संतुलन हवेच.
बॅलन्स्ड फंड म्हणजे बाजारातील उलथापालथीत किंवा वादळवाऱ्यात तग धरून राहण्यासाठी गुंतवणूक सुरक्षित ठेवणे याच्याशीच संलग्न आहे. यामध्ये “ वृध्दी ” होण्याच्या दृष्टीकोनातून किमान जोखीम ठेवण्याचे संतुलन फंड मॅनेजर राखतो.
यामध्ये वृद्धीच्या दृष्टीने ६०% ते ७०% गुंतवणूक समभागात असते व ३०% ते ४०% गुंतवणूक रोख्यामध्ये ठेवली जाते.
बाजार तेजीत असताना मोठे समभाग घेऊन फायदा मिळविला जातो व जेव्हा मंदी सुरु असते तेव्हा हा फायदा रोख्यामध्ये गुंतवून जोखीम कमी केली जाते हा फेरबदल बाजाराच्या स्थितीवर केला जातो.
या फंडातील गुंतवणूक ही Equity व Debt फंडात जरी असली तरी या फंडाला ” Equity “ फंडच संबोधले जाते. त्यामुळेच यातील गुंतवणूकीवर झालेला फायदा जर एक वर्षानंतर जमा केला तर त्यावर टॅक्स नाही!
BNP पारिबास या कंपनीचा बॅलन्स्ड फंडाचा NFO ऑनलाईन खरेदीसाठी ३१-०३-२०१७ पर्यंत खुला होता. त्यानंतर ७ एप्रिल २०१७ पर्यंत सुध्दा ३१-०३-२०१७ चे चेकव्दारे ऑफलाइन पध्दतीने याची खरेदी शक्य आहे.
बहुतेक सर्व फंड घराण्यांचे balance fund खरेदीसाठी उपलब्ध आहेत .
तसेच UTI Balanced फंडातील परतावा हा गेली १२ ते १५ वर्षे १२% पेक्षा जास्त चक्रवाढ पध्दतीचा आहे.
ज्यांना बँकेतील फिक्स डीपॉझीटवर व्याज कमी झाले असल्याने नुकसान होत आहे असे वाटत आहे त्यांनी या “ संतुलित फंडामध्ये “ गुंतवणूक करणे निश्चितच फायदेशीर आहे!
Thanks lots sir.
PJPatilsaheb,
u can think for SWP pattern for your investment
वा, फार छान माहिती..
hallo
तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून बोलावे