टाटा मोटर्सने नुकतीच पहिली इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. टाटाने टिगोर या गाडीचे Tigor EV नावाने आता इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणले आहे.  एकदा गाडी पूर्णपणे चार्ज केल्यानंतर ती 142 कि.मी. अंतर धावणार आहे. शिवाय कंपनीकडून तीन वर्षाची आणि 1 लाख 25 हजार किमीची वॉरंटी देण्यात आली आहे. टाटाने टिगोर EV ची 9.99 लाख रुपये एक्स शोरुम किंमत निश्चित केली आहे. यामध्ये सबसिडीचा देखील समावेश करण्यात आला आहे.

टाटा टिगोर EV व्हर्जन: टाटा टिगोर EV XM आणि : टाटा टिगोर EV XT व्हर्जन असे दोन व्हर्जन सादर करण्यात आले आहे.

टाटा टिगोर EV XM : 9.99 लाख रुपये
टाटा टिगोर EV XT : 10.90 लाख रुपये

सध्या कमर्शियल वापरासाठी कंपनीकडून ही गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासगी वापरासाठी अजून ही गाडी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

अभिप्राय द्या!