केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात जुलै ते सप्टेंबर 2019 या तिमाहीसाठी 0.10 टक्के कपात जाहीर केली. यामध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), किसान विकास पत्र (केव्हीपी), मासिक प्राप्ती योजना (एमआयएस) आदी योजनांचा समावेश आहे.
अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, नव्या तिमाहीसाठी “पीपीएफ’चा वार्षिक व्याजदर 8 टक्‍क्‍यांवरून आता 7.9 टक्के असेल. पाचवर्षीय “एनएससी’चा व्याजदरही तेवढाच असेल. “केव्हीपी’वर आता 7.6 टक्के व्याज दिले जाणार असून, यातील गुंतवणूक 113 महिन्यांत दामदुप्पट होणार आहे. निवृत्तिधारकांमध्ये लोकप्रिय असलेल्या “एमआयएस’वर आता 7.6 टक्के व्याज दिले जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेवर (एससीएसएस) 8.6, तर खास मुलींसाठीच्या सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.5 टक्‍क्‍यांवरून 8.4 टक्‍क्‍यांवर आणला गेला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu