मुलांच्या भवितव्यासाठी बाजारात अनेक योजना असल्याने  निवडीचा गोंधळ उडत आहे. या पार्श्वभूमीवर काही खात्रीशीर चांगल्या योजनांचा घेतलेलाआढावा…

सुरक्षितता, चांगला परतावा आणि रोकड सुलभता असणारी तसेच जोडीला करसवलतही देणारी योजना म्हणजे चांगली योजना असे समजले जाते. अनेक प्रकारच्या योजना सरकार, बँका, वित्तीय संस्था, विमा कंपन्या, म्युच्युअल फंडाच्या अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या यांनी बाजारात आणल्या आहेत. दुर्दैवाने वरील सर्व अपेक्षा पूर्ण केल्या जातील अशी एकही योजना नाही. छोटे विभक्त कुटुंब, वाढती महागाई आणि शिक्षणावरील खर्चात दिवसेंदिवस होणारी वाढ यांमुळे अनेकांना मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने काहीतरी भरीव तरतूद आधीपासूनच करावी, असे कायम वाटते.

लोकांच्या या मानसिकतेचा विमा कंपन्या पुरेपूर फायदा घेत असून, मुलांच्या कल्याणासाठी म्हणून खास योजना त्यांनी बाजारात आणल्या आहेत. या योजना त्यांच्या दोन ते तीन योजनांची सरमिसळ असून, त्यातून मिळणारा परतावा सात टक्क्यांच्या आसपास आहे. योजना काळात विमाधारकाचे बरेवाईट झाल्यास करारात नमूद केलेले संरक्षण मिळते. म्हणून त्याला विमा योजना म्हणायचे एवढेच… तेव्हा अशा प्रकारच्या योजना या फारश्या आकर्षक नाहीत. माहीत असलेले मोजके पर्याय, एजंटचे नेटवर्क आणि त्यांनी केलेले भावनिक आवाहन यामुळे गुंतवणूकदार अशा योजना खरेदी करीत आहेत. त्यामुळे कोणती योजना अधिक चांगली, याबाबत इतरांच्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून, अनेक पालक संभ्रमात आहेत. केवळ मुलींसाठी असलेली सुकन्या समृद्धी योजना ही एकमेव सरकारी योजना असून सध्या त्यावर वार्षिक ८.५ टक्के दराने व्याज मिळते. ही योजना फक्त १० वर्षांखालील मुलींसाठी असल्याचे तसेच यातील रक्कम फक्त मुलीला मिळत असल्याने त्याचा फायदा मर्यादित लोकच घेऊ शकतात.

शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे. कर्जाच्या सोयी उपलब्ध असल्या, तरी सर्वांचा कल हा काहीही करून शिक्षणास पैसे कमी पडू नयेत असा असतो. अधिक महागडे शिक्षण म्हणजे अधिक चांगले शिक्षण असा सर्वसाधारण कल आहे.

 लग्न समारंभ अविस्मरणीय व्हावा अशी अनेकांची इच्छा असते. विविध मालिका, चित्रपट यातील भव्यदिव्य लग्नसमारंभ पाहून सर्वांना असा खर्च केला पाहिजे असे वाटत आहे. त्यामुळे यावर चढाओढीने अधिकाधिक खर्च केला जात आहे.

रांच्या वाढत्या किमतीमुळे नव्याने विकसित होत असलेल्या शहरातही घर घेणे परवडत नाही. जरी घर घेण्यासाठी कर्जाची सोय उपलब्ध असली, तरी त्यातील किमान गरजेच्या गोष्टी घेण्यासही बरीच रक्कम लागते. यासाठी काही मदत व्हावी असा यामागील हेतू आहे.

मुलांनी काही व्यवसाय करायचा ठरवल्यास त्यासाठी लागणाऱ्या संभाव्य भांडवलाची गरज यातून भागवली जाईल असे पालकांना वाटते.

म्युच्युअल फंडांच्या योजना : अशा योजना व्यक्ती किंवा त्यांची मुले यांच्यासाठी असल्या, तरी त्यात फार काही फरक नसतो. म्हणून आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी अशी गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी आपल्या नावावर वेगळा पोर्टफोलिओ निर्माण करून त्यात ‘एसआयपी’च्या माध्यमातून नियमित गुंतवणूक करावी. इक्विटी योजनांतून दीर्घकाळात चांगला परतावा मिळू शकतो. करसवलत घ्यायची असल्यास ‘ईएलएसएस’चा विचार करावा. सहज उपलब्ध आहे म्हणून त्याच्या निव्वळ मालमत्ता मूल्याचा फारसा विचार करू नये. आपल्याला पैशांची अंदाजे कधी गरज लागू शकेल त्याच्या दोन ते तीन वर्षे आधी योजनेतून मिळत असलेला परतावा पाहून, तो आपणास अपेक्षित किंवा असाधारण असेल तर ‘एसआयपी’ खंडित न करता पूर्ण रक्कम काढून लिक्विड फंडात वळवावी. याचा उपयोग आपल्या खऱ्याखुऱ्या गरजेनुसार करता येईल आणि बाजारातील अनिश्चतीचा त्यावर परिमाण होणार नाही. दहा वर्षांहून अधिक काळ सातत्याने गुंतवणूक करीत राहिल्यास चक्रवाढ व्याजाने किमान १५ टक्के परतावा मिळायला हरकत नाही. योजनेची निवड करण्यात काही अडचण वाटत असल्यास व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्यावी.

पण UTI व आदित्य बिर्ला या फंड house च्या बाल भविष्य योजना या साधारणपणे १० % ते १२ % परतावा देणाऱ्या योजना अत्यंत चांगल्या योजना आहेत !! व यासाठी आपण शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाशी कामकाजाच्या दिवशी केव्हाही संपर्क साधू शकता !!

 

अभिप्राय द्या!