इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा भाग म्हणून यापुढे इलेक्ट्रीक वाहन घेणाऱ्यांसाठी सरकराने विशेष योजना आणली आहे. इलेक्ट्रीक वाहन कर्जाने विकत घेणाऱ्यांना 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त प्राप्तिकर सवलत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जाहीर केली आहे.
कर्जावर भरण्यात येणाऱ्या व्याजावर ही करसवलत दिली जाणार आहे. यातून रस्त्यांवर इलेक्ट्रीक वाहने येण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
प्रदूषणमुक्त भारताच्या दिशेने भक्कम पाऊल उचलताना मोदी सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या यंदाच्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये ही घोषणा झाली. 
 
देशातील जवळपास सर्वच प्रमुख शहरे प्रदूषणाच्या समस्येने वेढली गेली आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नांमधील एक भाग म्हणजे इलेक्‍ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्याची योजना सरकारने आखली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu