करपात्र उत्पन्न नसल्याचे सांगत विवरणपत्र न भरणाऱ्या मात्र भरमसाट खर्च करणाऱ्या नागरिकांना चालू वर्षापासून विवरणपत्र भरावे लागणार आहे.
विदेशातील पर्यटनावर दोन लाख रुपये खर्च करणारे, बँक खात्यात वर्षभरात एक कोटी रुपयांची रक्कम जमा करणारे व ज्यांच्या वार्षिक वीजदेयकाचा एकूण खर्च एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींना प्राप्तिकर विवरणपत्र सादर करणे अनिवार्य ठरणार आहे. या व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न करकक्षेत मोडत नसले तरीही त्यांना विवरणपत्र भरावे लागेल, असे अर्थसंकल्पासंबंधी कागदपत्रांत स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९मध्ये बदल करण्यात येणार आहे.