मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने नवा ‘मिरे अॅसेट मिडकॅप फंड’ बाजारात आणला आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील म्युच्युअल फंड आहे. या फंडाचा एनएफओ 8 जुलैला खुला होत असून 22 जुलै ही त्याची अंतिम मुदत आहे. निफ्टी मिडकॅप 100 इंडेक्स हा निर्देशांक या नव्या फंडाचा बेंचमार्क असणार आहे. रोकडच्या अभावाची जोखीम टाळून चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे या फंडाचे उद्दिष्ट आहे.
या फंडाचे व्यवस्थापन अंकित जैन करणार आहेत. नव्या ‘मिरे अॅसेट मिडकॅप फंडात किमान 5,000 रुपयांची गुंतवणूक करता येणार आहे. जर एक वर्षाच्या आत गुंतवणूक काढून घेतली तर 1 टक्के एक्झिट लोड आकारला जाणार आहे. एक वर्षानंतर काढून घेतल्या जाणाऱ्या गुंतवणूकीला मात्र एक्झिड लोड लागू होणार नाही. गुंतवणूकदार आणि भागीदारांना वैविध्यपूर्ण सेवा पुरवण्यासाठी मिरे अॅसेट म्युच्युअल फंड आपल्या फंडांची संख्या वाढवत नेत आहे.
सध्या मिडकॅप प्रकारातील शेअर लार्ज कॅप प्रकारापेक्षा चांगल्या किंमतीत उपलब्ध होत आहेत त्यामुळे या प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तीन ते पाच वर्षांच्या गुंतवणूक कालावधीचे उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. व यासाठी अधिक माहिती हवी असल्यास आपण शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाशी संपर्क साधावा .

अभिप्राय द्या!

Close Menu