टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) तब्बल 8,131 कोटी रुपये नफा झाला आहे. जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला घवघवीत नफा मिळाला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत झालेल्या नफ्याच्या तुलनेत 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 7,340 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 
 
टीसीएसने विश्लेषकांचे अंदाज चुकवत दमदार कामगिरी करून दाखवली आहे. टीसीएसच्या महसूलातसुद्धा चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल 38,172 कोटी रुपयांवर पोचला आहे. महसूलातील वाढ 11.4 टक्के इतकी आहे. ओपरेटिंग मार्जिन 24.2 टक्के इतका आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने समभागधारकांसाठी 5 रुपये प्रति शेअरचा अंतरिम डिव्हिडंड जाहीर केला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu