देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी जून महिन्यातही सुरू आहे. जून महिन्यात वाहन विक्रीमध्ये 12.3 टक्क्यांची घट झाली आहे. जूनमध्ये एकूण 19 लाख 97 हजार 952 वाहनांची विक्री झाली आहे. वाहनांच्या प्रत्येक विभागातील घट ही दोन आकडी आहे. अर्थव्यवस्थेत रोकडचा अभाव असल्याचा मोठाच फटका वाहन व्यवसायाला बसला आहे. सर्वच श्रेणीतील वाहनांची विक्री घटली आहे. त्यातल्या त्यात महिंद्रा अॅंड महिंद्रा आणि ह्युंदाई मोटरने बाजारात आणलेल्या एसयुव्ही प्रकारातील वाहनांमुळे वाहन विक्रीतील घट काहीशी सावरली गेली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu