आज आषाढी एकादशी !!

पंढरपूरच्या वारीच्या बातम्या पाहून अनेकांच्या मनात लवकर निवृत्त होऊन वारीचा आनंद घ्यावा असे वाटत असणार त्यासाठी खालील भाग वाचाच !!

लवकर निवृत्ती स्वीकारण्याच्या दृष्टीने तर पहिले पाऊल म्हणजे, निवृत्तीच्या वेळी तुम्हाला नेमका किती निधी आवश्यक असेल, ते ठरविणे. निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी असणाऱ्या निधीचे नियोजन करताना सध्याची जीवनशैली विचारात घेणे गरजेचे आहे. सध्याचे खर्च, अपेक्षित आयुर्मान, भविष्यातील वैद्यकीय खर्चासाठी आरोग्य विम्याची पुरेशी तरतूद त्या व्यक्तीचा जोखिमांक, हे घटक विचारात घ्यायला हवेत. तुमच्या निवृत्तीनंतरच्या निधीचा अंदाज वर्तवण्यासाठी व्यावसायिक वित्तीय सल्लागाराची मदत घेणे कधीही चांगले. तुमचे वय वाढेल, तसे आरोग्यसेवेचा खर्चही वाढण्याची शक्यता असते. आरोग्यासेवांसाठी येणाऱ्या खर्चामुळे तुमच्या निधीमध्ये घट होऊ नये, यासाठी निवृत्तीनंतर आवश्यक असणारी रक्कम ठरवत असताना हा खर्च विचारात घ्यायला हवा.

निवृत्तीकोशासाठी संचय करण्यासाठी जितक्या लवकर सुरुवात केली जाईल, तितका मोठा निधी उभारणे शक्य होऊ शकेल. म्हणूनच, अर्थार्जनाच्या सुरुवातीच्या काळापासून गुंतवणूक करायला सुरुवात करणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये, तुमची जोखीम घेण्याची क्षमता अधिक असू शकते आणि इक्विटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या जितक्या लवकर ‘एसआयपी’ चालू कराल, तितका फायदा जास्त होईल; शिवाय कमी वयात गुंतवणूक करायला लागणारी रक्कमही कमी असेल. उदा. जर एखाद्याचे निवृत्तीपर्यंत रु. पाच कोटी जमा करण्याचे उद्दिष्ट असेल आणि निवृत्तीला अजून ३० वर्षेकालावधी बाकी असेल, तर साधारणपणे वार्षिक परतावा १० टक्के धरल्यास दरमहा फक्त २१,९३६ रुपये गुंतविल्यास हे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. परंतु हेच ध्येय साध्य करण्यासाठी २५ वर्षेकालावधी बाकी असेल, आणि वार्षिक परतावा १० टक्के धरल्यास दरमहा ३७,३७२ रुपये गुंतवावे लागतील. आपण आपल्या गुंतवणुकीला वाढण्यासाठी पुरेसा वेळ दिला, तर हीच गुंतवणूक तुम्हाला कैकपटीने परतावा देऊ शकते. चक्रवाढीचा आनंद अनुभवता येतो. निवृत्तीकोशासाठी धन संचय करण्यासाठी वित्तीय साधनांची निवड करताना निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांपेक्षा मार्केट-लिंक्ड उत्पादनांची निवड अधिक फायदेशीर ठरते.

व यासंबंधी अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्क साधा !

अभिप्राय द्या!

Close Menu