सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’पाठोपाठ आता एमिजिएट पेमेंट सर्व्हिसच्या (आयएमपीएस –  IMPS) माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्कही हटविण्याचा निर्णय घेतला आहे. याची अंमलबजावणी 1 ऑगस्टपासून होणार असल्याची माहिती बॅंकेने आज एका पत्रकाद्वारे दिली.

रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बॅंकेने ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’द्वारे होणाऱ्या व्यवहारांवरील शुल्काची आकारणी 1 जुलैपासून थांबविली आहे. त्याप्रमाणे इंटरनेट, मोबाईल बॅंकिंग तसेच योनो ऍपद्वारे ‘आयएमपीएस’च्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवरही 1 ऑगस्टपासून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे बॅंकेने स्पष्ट केले.

अभिप्राय द्या!

Close Menu