सरलेल्या आर्थिक वर्षासाठी (2018-19) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2019 अशी आहे.  ज्यांनी अजून विवरणपत्र भरले नसेल त्यांनी ते भरण्याची त्वरा केली पाहिजे. करदात्यांनी वेळेतच प्राप्तिकर विवरणपत्र भरावे. अन्यथा त्यांना 5,000 रुयांच्या दंडाला सामोरे जावे लागेल, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.
ज्यांचे पगारातून मिळणारे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यत असेल त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आता सुलभपणे भरणे शक्य होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकराच्या विविध मर्यादांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 5 लाखापर्यत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. (त्यांना कलम 87 अ सूट मिळवण्याची उत्पन्न मर्यादा साडेतीन लाखांवरून पाच लाखापर्यत हंगामी अर्थसंकल्पातच वाढवण्यात आली होती.)
यावेळच्या अर्थसंकल्पात देण्यात आलेली आणखी एक सुविधा म्हणजे तुम्ही पॅन कार्डऐवजी आधार कार्डद्वारेसुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकता.

अभिप्राय द्या!

Close Menu