टीव्हीएस मोटरने भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल बाजारात आणली आहे. ‘अपाचे आरटीआर 200 एफआय ई100’ असे या नव्या मोटरसायकलचे नाव आहे. या नव्या मोटरसायकलची किंमत 1.2 लाख रुपये इतकी आहे. सरकार सध्या दुचाकी निर्मिती कंपन्यांवर पेट्रोल, डिसेलवर आधारित वाहने बंद करून अपांरपारिक ऊर्जा प्रकारांवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीसाठी दबाव वाढवत आहे. टीव्हीएस देशातील तिसऱ्या क्रमांकाची दुचाकी वाहन निर्मिती कंपनी आहे.
टीव्हीएसच्या याच श्रेणीतील पेट्रोलवर चालणाऱ्या मोटरसायकलची किंमत 11 हजारांनी कमी आहे. ही नवी मोटरसायकल पूर्णपणे इथेनॉलवर चालते. सुरूवातीला ही मोटरसायकल महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. ब्राझिलसारख्या देशात पेट्रोलला पर्यायी म्हणून इथेनॉलचा प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे. भारतातही हा पर्याय उपयुक्त ठरू शकतो.

अभिप्राय द्या!

Close Menu