मंदावलेल्या अर्थचक्राला गतीमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी (ता.7) रेपोदरात 0.35 टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर 5.75 टक्‍क्‍यांवरून 5.40 टक्के झाला आहे. नजिकच्या काळात गृह आणि वाहन कर्जाचे दर कमी होतील, असा विश्‍वास रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे. 
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत पार पडली.  वृद्धीदरातील घसरणीने अर्थव्यवस्था संकटात आहे. बिगर बॅंकिंग वित्त संस्थांमधील रोख टंचाई, बॅंकांमधील बुडीत कर्जे, गुंतवणुकीचे प्रमाण कमी होणे, वस्तूंच्या विक्रीवर परिणाम आणि विकासदर सहा टक्‍क्‍यांखाली गेल्याबाबत बॅंकेने चिंता व्यक्त केली आहे. मॉन्सूनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली असून नजिकच्या काळात चलनवाढ नियंत्रणात राहील असे बॅंकेने म्हटले आहे. सलग चार पतधोरणात रेपो दर 1.10 टक्‍क्‍याने कमी झाल्याने बॅंकांनी त्याचा लाभ ग्राहकांना द्यावा, असे आवाहन गव्हर्नर शक्तिकाति दास यांनी यावेळी केले.

अभिप्राय द्या!