टाटा समूहातील महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा स्टीलच्या नफ्यात जूनअखेर तब्बल 64 टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीला 693 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला 1,940.8 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या इतर उत्पन्नातही घट झाली आहे. टाटा स्टीलचा महसूल 1.27 टक्क्यांनी वाढून 35,947.1 कोटी रुपयांवर पोचला आहे. देशांतर्गत आणि युरोपातील अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे टाटा स्टीलच्या नफ्यात मोठी घसरण झाली आहे.
टाटा स्टीलचा भारतातील व्यवसाय 2 टक्क्यांनी घटून 16,091 कोटी रुपयांवर पोचला आहे. तर टाटा स्टीलचा युरोपातील महसूल 11.77 टक्क्यांनी घटून 14,495 कोटी रुपयांवर घसरला आहे. देशातील अर्थव्यवस्था मंदावल्यामुळे स्टीलच्या किंमतीतही घट झाली आहे. मात्र कंपनीच्या पोलाद उत्पादनात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu