मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज लि. आपल्या व्यवसायातील 20 टक्के हिस्सा सौदी अरोमकोला विकणार आहे. सौदी अरामको ही अरेबियाची सर्वात मोठी आणि पेट्रोलियम क्षेत्रातील जगातील सर्वात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी यासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. सौदी अरामको रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलशुद्धीकरण आणि केमिकल व्यवसायामधील 20 टक्के हिस्सा 75 अब्ज डॉलरला (जवळपास 5 लाख 32 हजार 466 कोटी रुपये) विकत घेणार आहे. 
 
दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भातील करार झाला आहे. देशाच्या इतिहासातील एखाद्या कंपनीतील ही सर्वात मोठी परकी गुंतवणूक ठरणार आहे. या व्यवहारानुसार सौदी अरामको रोज 5 लाख बॅरल किंवा दरवर्षी 2.5 कोटी टन कच्च्या तेलाच्या पुरवठा रिलायन्सच्या गुजरातमधील जामनगर येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला करणार आहे. रिलायन्सच्या जामनगर येथील दोन्ही रिफायनरीमध्ये आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये अरामकोचा 20 टक्के हिस्सा असणार आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu