डेट फंडात गुंतवणूक करताना फक्त ‘लिस्टेड एनसीडी’ची मर्यादा शिथिल करून आता म्युच्युअल फंड कंपन्यांना ‘अन-लिस्टेड एनसीडी’ज मध्ये देखील गुंतवणूक करता येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या सेबीच्या वार्षिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे मागील दोन महिन्यांपूर्वीच सेबीने ‘लिस्टेड एनसीडी’ची मर्यादा घातली होती. 
 
सेबीच्या नवीन निर्णयामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांना गुंतवणुकीसाठी नवीन क्षेत्र खुले होणार आहे तर अन-लिस्टेड कंपन्यांना देखील त्याचा फायदा होणार आहे. मात्र, लिस्टेड एनसीडीसाठी असलेली एक वर्षांची गुंतवणूक मर्यादा मात्र अन-लिस्टेड एनसीडीज साठी एक महिना इतकीच असणार आहे. जेणेकरून, म्युच्युअल फंड कंपन्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार नाही. 
 
नवीन नियमानुसार म्युच्युअल फंड कंपन्या डेट फंडांतर्गत 10 टक्के गुंतवणूक अन-लिस्टेड एनसीडी’जमध्ये करू शकतात. 

अभिप्राय द्या!