पाच वर्षांवरील एसआयपी गुंतवणूक 100 टक्के फायद्याची असून नकारात्मक परतावा (निगेटिव्ह रिटर्न्स) मिळण्याची शक्यता पूर्णपणे संपून जाते असा निष्कर्ष म्युच्युअल फंडाची शिखर संस्था ‘अँफी’ आणि पतमानांकन संस्था ‘क्रिसिल’ने सादर अहवालातून स्पष्ट झाले आहे. गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त असेल तितका नकारात्मक परतावा मिळण्याची शक्यता कमी होत जाते. म्हणून म्युच्ययुअल फंडातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी असणे आवश्यक असल्याचे समोर आले आहे.
 
अँफी – क्रिसिल ने हा अहवाल सादर करताना जून 2019 पासून मागील 15 वर्षांच्या आकडेवारीचा विचार केला आहे. त्यानुसार, जसा गुंतवणुकीचा कालावधी जास्त असेल तसा गुंतवणुकीची योजना, कंपनी यांसारखे घटक जास्त महत्वाचे ठरत नाहीत. कोणत्याही योजनेत केलेली गुंतवणूक ही फायद्याचीच ठरते असे या आकडेवारीतून दिसते.

अभिप्राय द्या!