एचडीएफसी बॅंक ही भारतीय बॅंकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रातील सर्वाधिक लखलखणारी बॅंक आहे. बॅंकेची मालमत्ता, त्याची गुणवत्ता आणि बाजारातील बॅंकेचा हिस्सा याच्या जोरावर एचडीएफसी बॅंकेने सातत्याने दमदार कामगिरी केली आहे. मागील दहा वर्षात बॅंकेने गुंतवणूकदारांना 668 टक्क्यांचा दणदणीत परतावा देत मालामाल केले आहे. 
 
दहा वर्षांपूर्वी याच तिमाहीत 291 रुपये प्रति शेअर या किंमतीवर असणारा एचडीएफसी बॅंकेचा शेअर शुक्रवारी दिवसअखेर राष्ट्रीय शेअर बाजारात 2241.75 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करत होता. उत्तम परतावा आणि त्यासोबतच सुरक्षितता या दुग्धशर्करा योगामुळे एचडीएफसी बॅंक गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय आहे. भविष्यातसुद्धा एचडीएफसी बॅंकेकडून नवी उंची गाठत भरघोस परतावा मिळेल असे तज्ज्ञांना वाटते. 
 
बॅंकेच्या शेअरची किंमत आणि अर्निग पर शेअर (ईपीएस) या दोन्ही घटकांनी 2010 पासून वार्षिक चक्रवाढ पद्धतीने 20 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. सद्य परिस्थितीत सुद्धा एचडीएफसी बॅंक हा गुंतवणूकीचा एक चांगला पर्याय असल्याचे मत विश्लेषक व्यक्त करतात. मॉर्गन स्टॅनलेनुसार एचडीएफसी बॅंकेचे कर्ज वितरण व्यवसाय पुढील दोन ते तीन वर्ष भरभक्कमच असणार आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu