इक्विटी प्रकारातील मल्टी कॅप फंडातील नवीन योजनेच्या एनएफओच्या (न्यू फंड ऑफरच्या) माध्यमातून सुंदरम म्युच्युअल फंडाने 357 कोटींची उभारणी केली आहे. 30 ऑगस्ट पर्यंत हा फंड गुंतवणुकीसाठी खुला होता.
 
 मल्टी कॅप फंड मॅनेजर्सला लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये परिस्थितीनुसार बदल करण्याची संधी असते. परिणामी बाजाराच्या अस्थिरतेचा फंडाच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदारास आपला कॉर्पस लार्ज कॅप मधून मिड किंवा स्मॉल कॅपमध्ये बदलवायचा असेल तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो त्यामुळे मल्टी कॅप फंड जास्त फायदेशीर ठरत असल्याचे गुतंवणूकदार तिकडे आकर्षित होतात. 

अभिप्राय द्या!

Close Menu