कमर्शियल पेपर्सच्या माध्यमातून गुंतवण्यात आलेले 150 कोटी रुपये ‘डीएचएफएल’ने चुकते केले असल्याचे डीएसपी म्युच्युअल फंडाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. परिणामी, डीएसपी म्युच्युअल फंडाच्या डेट प्रकारातील योजनांचा एनएव्हीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
 
डीएसपी म्युच्युअल फंडाची ‘डीएचएफएल’कडे असलेली सर्व थकीत थकबाकी तीन टप्प्यात प्राप्त झाल्याचे कंपनीने सांगितले. 25 जून रोजी 60 कोटी रुपये, त्यानंतर 28 जून 15 कोटी आणि 07 सप्टेंबर 2019 रोजी 75 कोटी रुपये याप्रमाणे ‘डीएचएफएल’ने ही देणी चुकती केली. 

अभिप्राय द्या!

Close Menu