सिक्युरिटिज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) बॉंड मार्केटमधील गुंतवणूक युपीआय अॅपद्वारे करण्याच्या प्रस्तावावर विचार करते आहे. याआधीच काही महिन्यांपूर्वी सेबीने गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) अॅपद्वारे गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. छोट्या किंवा सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी युपीआय अॅपचा विचार केला जात आहे!!
कॉर्पोरेट बॉंडची पारदर्शकता वाढवण्यासाठी सेबीने 1 टक्के सिक्युरिटी डिपॉझिटचा नियमसुद्धा काढून टाकला आहे. त्याचबरोबर बॉंडची नोंदणी होण्याचा कालावधी कमी करून 12 दिवसांवरून 6 दिवसांवर आणला आहे. या सर्व पावलांमुळे भारतातील कॉर्पोरेट बॉंड बाजारात आणण्याच्या खर्चात कपात होईल अशी आशाही त्यागी यांनी व्यक्त केली. सध्या किरकोळ गुंतवणूकदार कॉर्पोरेट बॉंड आणि सरकारी कर्जरोखे यामध्ये शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंड कंपन्यांद्वारे गुंतवणूक करू शकतात. त्याशिवाय ते कॉर्पोरेट बॉंडमध्ये विमा योजना, प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन फंडाद्वारे गुंतवणूक करू शकतात.