ज्या कंपन्यांचा वार्षिक टर्नओव्हर साधारणतः 2 कोटी रुपयांपर्यंत आहे अशा कंपन्यांना ‘जीएसटी रिटर्न’ भरण्यापासून सूट मिळण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार 20 सप्टेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे छोट्या उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे.
2017 साली जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर आर्थिक वर्ष 2017-18 साठी रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2018 होती त्यात तीन वेळा वाढ करून 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.
जीएसटी भरणाऱ्यांच्या अधिकृत आकडेवारीनुसार एकूण 1.39 कोटी व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. यात 2 कोटींपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांची संख्या 85 टक्के इतकी आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu