जीएसटी कौन्सिलची बैठक येत्या शुक्रवारी (20 सप्टेंबर) गोवा येथे होते आहे. या बैठकीत कारपासून ते बिस्किटांपर्यत अनेक वस्तूंवरील जीएसटी करांमध्ये कपात करण्याच्या मागणीवर विचार केला जाला आहे. त्याचबरोबर महसूली उत्पन्न हासुद्धा या कौन्सिलसमोरील महत्त्वाचा मुद्दा असेल. कारण जीएसटी करात केलेल्या कपातीचा प्रत्यक्ष परिणाम सरकारच्या महसूली उत्पन्नात घट होण्यात होणार आहे. 
 
 सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील जीएसटी करात कपात करण्याचा मुद्दा या बैठकीत केंद्रस्थानी असणार आहे. अर्थव्यवस्थेचा विकासदर 5 टक्क्यांवर  आला आहे. 

अभिप्राय द्या!

Close Menu