ज्या ग्राहकांना फेल झालेल्या डिजीटल व्यवहाराचे पैसै एक दिवसाच्या आत मिळणार नाही त्यांना यापुढे बँक आणि डिजीटल वॉलेट्स दंडापोटी दररोज १०० रुपये देणार आहेत. UPI, IMPS, NACH द्वारे पेमेंट केल्यास हा नियम लागू आहे.

डिजीटल व्यवहारांव्यतिरिक्त RBI ने नॉन-डिजीटल ट्रान्झॅक्शन्ससाठीही वेळेची मर्यादा आखून दिली आहे. एटीएम आणि मायक्रो एटीएममध्ये अयशस्वी झालेल्या व्यवहारांसाठी खात्यात पैसै येण्यास पाच दिवसांपर्यंतची मर्यादा आखण्यात आली आहे. त्यानंतर दररोज १०० रुपये दंड बँकांना द्यावा लागेल. ही दंडाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात त्वरीत पोहोचायला हवी, ग्राहकांनी तक्रार करण्याची वाट बँकांना पाहू नये, असंही RBI ने परिपत्रकात नमूद केलं आहे.

अभिप्राय द्या!