‘‘मागील वर्षभरातील गुंतवणुकीचे मुद्दल शाबूत ठेवणारे जे मोजके फंड आहेत त्यामध्ये यूटीआय इक्विटी फंडाचा समावेश होतो. एका वर्षांपूर्वी एकरकमी केलेल्या गुंतवणुकीवर ३.५६ टक्के तर एका वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘एसआयपी’चा वार्षिक परतावा ०.८७ टक्के आहे. फंडाचा अभ्यास करताना, ‘एस अँड पी बीएसई २०० टीआरआय’ हा एकच मानदंड असलेल्या अन्य फंडांच्या तुलनेत कामगिरी तपासली असता, यूटीआय इक्विटी फंडाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे. ज्या काळात बहुसंख्य फंड आपल्या मानदंडापेक्षा खराब कामगिरी करत असताना भांडवल शाबूत ठेवणाऱ्या या फंडात मी तुम्हाला गुंतवणुकीची शिफारस करीत आहे,’’
यूटीआय इक्विटी फंड हा लार्जकॅप केंद्रित मल्टीकॅप फंड असून विश्लेषणानुसार अन्य प्रमाणित विचलनाची तुलना केली असता, अन्य मल्टीकॅप फंडांपेक्षा तुलनेने स्थिर फंड आहे. यूटीआय इक्विटी फंडाचा जोखिमांक आणि परताव्याचा अंदाज बऱ्यापैकी बांधता येतो. फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या कंपन्यांपैकी ६० टक्के कंपन्यांचे बाजारमूल्य १२,००० कोटींपेक्षा अधिक आहे.
pradeep joshi