ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून 8,231 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. एसआयपीमधील गुंतवणूकीत मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता 7.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑगस्ट 2018 मध्ये एसआयपीद्वारे 7,658 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.
एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडात झालेली एकूण गुंतवणूक 41,098 कोटी रुपयांवर पोचली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2018 मध्ये हीच गुंतवणूक 36,760 कोटी रुपये इतकी होती. असोसिएन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडियाने (अॅम्फी) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्याने बाजारातील जोखीम कमी होत असल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्यावर भर दिला आहे.