युटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (एएमसी) पुढील सहा महिन्यात आयपीओ आणण्याचे नियोजन करते आहे. सध्या बाजारात निप्पॉन लाईफ एएमसी आणि एचडीएफसी एएमसी यो दोनच एएमसीची शेअरबाजारात नोंदणी झालेली आहे. युटीआय एएमसीला 12,000 कोटी ते 13,000 कोटी रुपयांच्या बाजारमूल्याची अपेक्षा आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनीला 2,500-3,000 कोटी रुपयांच्या भांडवलाच्या उभारणीची अपेक्षा आहे. 
 
सेबीच्या नियमावलीनुसार आयपीओच्या माध्यमातून कंपनीच्या शेअरची विक्री होणार आहे. युटीआय एएमसीमध्ये एलआयसी, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा हे चार देशांतर्गत गुंतवणूकदार आहेत. सेबीच्या मार्च 2018च्या नियमावलीनुसार ज्या गुंतवणूकदाराने एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीत किमान 10 टक्क्यांपर्यत गुंतवणूक केलेली असेल त्याला दुसऱ्या म्युच्युअल फंड कंपनीत तितक्याच प्रमाणात गुंतवणूक करता येणार नाही. 
 
सेबीचा हा नियम या चारही गुंतवणूकदारांना लागू होतो. त्याव्यतिरिक्त अमेरिकेच्या टी रोवे प्राईसचा युटीआय एएमसीमध्ये 26 टक्के हिस्सा आहे. 
युटीआय एएमसीची स्थापना 14 नोव्हेंबर 2002ला झाली होती आणि कंपनीने आपल्या कामकाजाची सुरूवात 1 फेब्रुवारी 2003ला केली होती.

अभिप्राय द्या!