अनिल अंबानी प्रवर्तित मत्ता व्यवस्थापन कंपनी ‘रिलायन्स म्युच्युअल फंडा’चे नाव बदलण्यात आले असून, ही कंपनी आता ‘निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड’ या नावाने ओळखली जाणार आहे. अंबानी यांनी कंपनीतील आपला हिस्सा विकल्याने नावात बदल होणार आहे. हा बदल झाल्याने ‘निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड’ ही देशातील सर्वांत मोठी विदेशी मत्ता व्यवस्थापन कंपनी बनली आहे. जपानची सर्वांत मोठी विमा कंपनी असणाऱ्या ‘निप्पॉन लाइफ इन्शुरन्स’चा ‘निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडा’तील हिस्सा वाढून आता ७५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

अभिप्राय द्या!