एचडीएफसी बँक लिमिटेडने  आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत  अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली आहे.

गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या कर्ज वाटपात १७.१ टक्के वाढ झाली असून ठेवींमध्ये १८.५ टक्के वाढ, तर मुदत ठेवींमध्ये २२.५ टक्के वाढ झाली आहे. बँकेचे नेट इंटरेस्ट मार्जनि ४.४ टक्क्यांवर गेले असून नक्त अनुत्पादित कर्ज केवळ ०.४३ टक्के आहेत. जून २०१९ साठी संपलेल्या पहिल्या तिमाहीसाठी बँकेने ३२,३६१.८४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५,५६८.१६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. बँकेची आर्थिक कामगिरी अशीच उत्तम राहील अशी अपेक्षा आहे. बँकेच्या दोन्ही उप-कंपन्या एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेड या दोन्ही कंपन्यांची कामगिरीदेखील उत्तम असून सध्याच्या वातावरणात ही फार महत्त्वाची बाब आहे.

गेल्याच महिन्यात शेअर्सचे विभाजन होऊन आता प्रति शेअर दर्शनी किंमत एक रुपया झाली आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कंपनी करातील कपातीचा लाभ एचडीएफसी बँकेला नक्कीच होईल. सध्या १२०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर कायम पोर्टफोलिओत ठेवण्यासाठी प्रदीर्घकालीन गुंतवणूक म्हणून दसऱ्याची उत्तम खरेदी ठरू शकेल.

प्रदीप जोशी

शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

अभिप्राय द्या!

Close Menu