सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) कर्ज आणखी स्वस्त केले आहे. रिझर्व्ह बँकेकडून दर कपात करण्यात आल्यानंतर आता एसबीआयने एमसीएलआरचे दर 0.10 टक्क्यांनी कमी केले आहे. परिणामी कर्जदर आता कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेने सलग पाच वेळा रेपो दरात कपात केली आहे. तर स्टेट बँकेने आपल्या दरात सलग सहावेळा कर्जाच्या दरात कपात केली आहे. नवीन कमी केलेले दर उद्यापासून म्हणजेच  10 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येतील.

अभिप्राय द्या!

Close Menu