मजूर, शेतकरी, कष्टकरी अशा सर्वसामान्य गुंतवणूकदाराला देखील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता यावी यासाठी म्युच्युअल फंड कंपन्यांनी एक पाऊल पुढे जात गुंतवणुकीची रक्कम 100 रुपयांवर आणली आहे. ही गुंतवणूक लम्प सम प्रकारात करता येणार आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड आणि रिलायन्स निप्पॉन लाइफ म्युच्युअल फंडाने हे क्रांतिकारक पाऊल उचलले आहे.
 
अलीकडेच रिलायन्स निप्पॉन लाइफ एमएफने आपल्या मल्टी कॅप फंड व ग्रोथ फंडामध्ये एकरकमी गुंतवणूकीसाठी किमान गुंतवणूकीची रक्कम 5000 रुपयांवरून 100 रुपये केली. विशेष म्हणजे 29 ऑगस्टपासूनच याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. आदित्य बिर्ला सन लाइफने देखील या अगोदरच ही योजना अंमलात आणली आहे.  

अभिप्राय द्या!