मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी  केंद्र सरकारकडून आता वैयक्तिक करातही सवलत देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ‘कॉर्पोरेट टॅक्स’मध्ये केलेल्या कपातीनंतर उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार समितीचे प्रमुख विवेक देबरॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार,  ‘कॉर्पोरेट टॅक्स’मध्ये कपात केल्यानंतर आता केंद्र सरकार वैयक्तिक करातही कपात करण्याची शक्यता आहे.
 
प्राप्तिकरात बदल करण्यासाठी एका ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली होती. या टास्क फोर्सने आपला अहवाल केंद्र सरकारला सोपविला असून करात कपात करण्याचा प्रस्ताव असून ५ टक्के, १० टक्के आणि २० टक्के अशी कर रचना करण्याची शिफारस केली आहे. सध्या ५ टक्के, २० टक्के आणि ३० टक्के असे तीन प्राप्तिकराचे टप्पे आहेत. 

अभिप्राय द्या!