मागील वर्षभरापासून संकटात असलेल्या वाहन उद्योग क्षेत्राकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली असताना ऍक्सिस म्युच्युअल फंडाने मात्र या क्षेत्रावर विश्वास दाखविला आहे. यावर्षी झालेला चांगला पाऊस यामुळे वाहन उद्योग क्षेत्राला पुन्हा एकदा चांगले दिवस येतील अशी चिन्हे निर्माण झाली असल्याचे ऍक्सिस म्युच्युअल फंडाचे इक्विटी हेड जिग्नेश गोपाणी यांनी म्हटले आहे.
ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार ऍक्सिस म्युच्युअल फंडाने आपल्या ऍक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंडामध्ये मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड, आयशर मोटर्स लि. आणि ऑटो घटक निर्माता कंपनी मदर्सन सुमी सिस्टम्स लि.मध्ये गुंतवणूक केली आहे. ऍक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंडाचा एकूण एयुएम 20,400 कोटी इतका आहे. फंडाने मागील वर्षी 20 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर मागील पाच वर्षांचा विचार करता फंडाने 14 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

 

अभिप्राय द्या!