सन १९९० मध्ये मी चिपळूणला असताना आमच्या शेजारी पोस्ट ऑफिस होते व तेथील पोस्टमास्तर माझ्याकडे बचतीचा मंत्र सांगण्यासाठी आले . त्यांनी दरमहा रू. ५०० / – ची NSC तुम्ही सुरु करावी असे सांगून ६ वर्षात ही रक्कम दुप्पट होईल त्याची पुनर्गुंतवणूक ४ वेळा  त्याच योजनेत करावी आणि निवृत्तीच्या  वेळी या परताव्याची रक्कम अतिरिक्त निवृत्तीवेतन म्हणून आपणास मिळू शकेल असे सांगितले .

त्यांची योजना स्वीकारून मी सहा वर्षे दरमहा रू.  ५०० /- ची NSC घेऊ लागलो . पण नंतर व्याजदर कमी कमी होत गेले , माझी चिपळूण येथून बदलीही झाली , व सर्वात महत्वाचे म्हणजे पोस्टल सेवेतील दिरंगाईमुळे ही मूळ रक्कम चौपट झालेली पाहण्याचे माझे स्वप्न प्रत्यक्षात अवतरलेच नाही !!

पण त्याचवेळी जर मी UTI च्या RBPF मध्ये दरमहा रू.५००/- गुंतवले असते तर मला निवृत्तीवेळी निश्चीतच किमान  रू.  १२ लक्ष  मिळाले असते, !!

पोस्ट , बँक यांचे कमी होणारे व्याजदर पाहता अर्थसाक्षरता हा विषय अधिक महत्वाचा झाला आहे .निव्वळ बचत न करता गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळणाऱ्या साधनांकडे वळणे अत्य्यावश्यक झाले आहे.

दरमहाच्या उत्पन्नातून होणारी बचत, ही आपली कमी कालावधीची उद्दिष्टे ,मध्यम कालावधीची उद्दिष्टे ,दीर्घ  कालावधीची उद्दिष्टे ,व निवृत्ती नंतरची गरज यामध्ये योग्य समतोल साधून विभागणे अत्यावश्यक झाले असून त्यासाठी तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे क्रमप्राप्त आहे .

जीवन विमा घेणे ही ” गुंतवणूक ” नाही , हे लक्षात घेवून term plan कडे वळणे जेवढे महत्वाचे तेवढेच निवृत्तीसाठी म्युच्युअल फंडामधून दीर्घकालीन गुंतवणूक करणेही अत्यावश्यक आहे .चारचाकी वाहन खरेदी , मुलीचे लग्न , मुलाचे उच्चशिक्षण , यासाठीही EQUITY फंडातून SIP करणे सुद्धा समजून घेणे महत्वाचे आहे .

सध्या भारतातील ६ कोटी लोकच M. F. मध्ये गुंतवणूक करतात.आपली लोकसंख्या लक्षात घेता M. F. मधील गुंतवणूक दुपटीपेक्षा काही वर्षातच वाढेल , तसेच त्याचापरतावासुद्धा. PPF मधील परतावा ELSS पेक्षा कितीतरी कमी आहे ही गोष्ट तरुण गुंतवणूकदारांच्या सुद्धा लक्षात आली आहे .तसेच भारतीय कंपन्यांचा वाढता जागतिक वरचष्मा त्यांचे शेअर मूल्य उंचावणारा आहे .स्वाभाविकच शेअरमधील परतावे हे वाढतेच आहेत .

एकंदरीत आर्थिक उद्दीष्टांची निश्चिती , आपली जीवनशैली , उत्पन्न , यातून सुयोग्य पर्यायांचा समतोल विचार करून , गुंतवणुकीचा आढावा घेवून ,सुख प्राप्तीसाठी अर्थसाक्षर होणे महत्वाचे !!

This Post Has 2 Comments

  1. Nilima Shamkant Bagul

    जोशी साहेब वेबसाइट अथ भान

    1. Pradeep Joshi

      thanks ! keep in touch !
      have a nice day !!
      pradeep joshi

अभिप्राय द्या!