यंदाच्या दिवाळीसाठी देशातील प्रसिद्ध ब्रोकिंग कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी काही कंपन्यांचे शेअर सुचविले आहेत. काही निवडक शेअर पहा
 
अ) आनंद राठी
 
1) रिलायन्स इंडस्ट्रीज, सध्याचा भाव ः रु. 1428.25 (उद्दिष्ट ः रु. 1610) ः ही देशातील खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी आणि सर्वाधिक नफा कमावणारी कंपनी आहे. मागील सहा वर्षांत “रिलायन्स’चा महसूल सातपटीने, तर नफा 14 पटीने वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 11,262 कोटी रुपयांचा दणदणीत नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता कंपनीच्या नफ्यात 18.37 टक्के वाढ झाली आहे. या कालावधीत महसूल 4.8 टक्‍क्‍यांनी वाढून 1,63,854 कोटी रुपयांवर पोचला आहे. 
 
2) भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स (बीईएल), सध्याचा भाव ः रु. 116.15 (उद्दिष्ट ः रु. 135) ः भारतीय लष्कराला विविध उत्पादनांचा पुरवठा करणारी ही महत्त्वाची कंपनी आहे. अलीकडेच भारतीय हवाई दलाकडून जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या “आकाश’ क्षेपणास्त्र यंत्रणेचा पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी 90 अब्ज रुपयांच्या ऑर्डर याआधीच मिळाल्या आहेत. 
 
3) हिंदुस्थान युनिलिव्हर, सध्याचा भाव ः रु. 2145.10 (उद्दिष्ट ः रु. 2422) ः ही देशातील सर्वांत मोठी “एफएमसीजी’ कंपनी आहे. कंपनीचे बाजारपेठेत मजबूत स्थान आहे. दुसऱ्या तिमाहीअखेर कंपनीच्या महसुलात 6.7 टक्के वाढ झाली आहे, तर करपश्‍चात नफ्यात 21 टक्के वाढ झाली आहे. मॉन्सून चांगला झाला असल्यामुळे कंपनीच्या विक्रीला अनुकूल स्थिती असणार आहे. 
 
ब) एचडीएफसी सिक्‍युरिटीज
 
1) बजाज ऑटो, सध्याचा भाव ः रु. 3133.75 (उद्दिष्ट ः रु. 3447) ः ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची दुचाकी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाची तीनचाकी उत्पादक कंपनी आहे. कंपनीचे अस्तित्व 79 पेक्षा जास्त देशांमध्ये आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 1402 कोटींचा नफा झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 22 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. लाभांश आणि करापोटी 2072 कोटी भरल्यानंतरदेखील सप्टेंबरअखेर कंपनीकडे 15,986 कोटी रुपयांची रोकड असल्याची माहिती कंपनीने दिलेली आहे. 
 
2) अल्ट्राटेक सिमेंट, सध्याचा भाव ः रु. 4199 (उद्दिष्ट ः रु. 4980) ः भारत ही जगातील सिमेंटसाठीची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. अल्ट्राटेक सिमेंटचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा 21 टक्के आहे. कंपनीची वार्षिक 11.735 कोटी टन ग्रे सिमेंट उत्पादनाची क्षमता आहे. 
 
3) सुदर्शन केमिकल, सध्याचा भाव ः रु. 398 (उद्दिष्ट ः रु. 460) ः पिगमेंट क्षेत्रातील जगातील चौथ्या क्रमांकाची, तर भारतातील सर्वांत मोठी कंपनी. भारतातील पिगमेंट व्यवसायात 35 टक्के हिस्सा. 400 पेक्षा जास्त उत्पादने. दरवर्षी 25-35 उत्पादने गरजेनुरूप बाजारात आणण्याचे व्यवस्थापनाचे उद्दिष्ट आहे. 
 
क) ऍक्‍सिस सिक्‍युरिटीज
 
1) कोटक महिंद्रा बॅंक, सध्याचा भाव ः रु. 1588.60 (उद्दिष्ट ः रु. 1800) ः बॅंकेची मालमत्तेची गुणवत्ता स्थिर स्थितीत (स्टेबल ऍसेट क्वॉलिटी) आहे. बॅंकेच्या कर्ज वितरण व्यवसायात वाढ अपेक्षित आहे. नॉन बॅंकिंग क्षेत्रातील बॅंकेच्या व्यवसायाची वाढ आणि नफ्याचे प्रमाण उत्तम आहे. 
 
2) एशियन पेंट्‌स, सध्याचा भाव ः रु. 1795.50 (उद्दिष्ट ः रु. 1935) ः देशातील सर्वांत मोठी आणि आशियातील तिसऱ्या क्रमांकाची पेंट कंपनी. डेकोरेटिव्ह पेंट्‌सच्या क्षेत्रातील व्यवसायवाढीला मोठी संधी. रिअल इस्टेटमधील मंदीचा प्रत्यक्ष परिणाम मर्यादित. पेंट व्यवसायातील इतर अनेक संधी उपलब्ध. टिअर-2, टिअर-3 शहरांमध्ये व्यवसायवाढीची मोठी संधी. 
 
3) एचसीएल टेक्‍नॉलॉजीज, सध्याचा भाव ः 1134.05 (उद्दिष्ट ः रु. 1250) ः नव्या व्यवसायाच्या संधीमुळे महसुलात वाढ होण्याची चिन्हे. “आयबीएम’बरोबरच्या भागीदारीमुळे व्यवसायात वाढ आणि महसुलात वाढ होणार. कंपनीच्या “मार्जिन’मध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा. 
 
ड) प्रॉफिट मार्ट
 
1) आयसीआयसीआय बॅंक, सध्याचा भाव ः रु. 469.10 (उद्दिष्ट ः रु. 510) ः बॅंकेची रिटेल व्यवसायाबरोबरच कर्जवितरण व्यवसायातही चांगली वाढ झाली आहे. जवळपास 9.6 ट्रिलियन रुपयांची मालमत्ता असलेली देशातील सर्वांत मोठ्या बॅंकांपैकी एक बॅंक. रिटेल कर्जवितरण व्यवसायात (पर्सनल लोन) 55 टक्‍क्‍यांची घवघवीत वाढ. 
 
2) राईट्‌स लि., सध्याचा भाव ः रु. 279.40 (उद्दिष्ट ः रु. 330) ः सार्वजनिक क्षेत्रातील मिनीरत्न एंटरप्राईझ, ट्रान्स्पोर्ट कन्सल्टन्सी आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील देशातील आघाडीची कंपनी. विक्रीमध्ये 62 टक्‍क्‍यांची भरघोस वाढ. कंपनीकडे जून 2019 अखेर 6052 कोटी रुपयांच्या मोठ्या ऑर्डर. 
 
3) महानगर गॅस, सध्याचा भाव ः रु. 972 (उद्दिष्ट ः रु. 1100) ः देशातील आघाडीची नैसर्गिक वायू वितरण कंपनी. मुंबई, रायगड जिल्हा परिसरात सीएनजी आणि पीएनजी वितरणासाठी अधिकृत असलेली एकमेव कंपनी. महसुलात आणि नफ्यात घवघवीत वाढ. उत्तम लाभांश देणारी कंपनी. 

अभिप्राय द्या!