टेक महिंद्रा या देशातील आघाडीच्या आयटी कंपनीला सप्टेंबरअखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत 1,124 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना करता टेक महिंद्राच्या नफ्यात 5.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्चअखेर कंपनीला 959.30 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचा एकूण महसूल 5.1 टक्क्यांनी 9069.90 कोटी रुपयांवर पोचला आहे.
मागील वर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 8,629.80 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. कंपनीला आयटी व्यवसायात 8,224.5 कोटी रुपयांचा तर बीपीओ व्यवसायात 845.4  कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu