फोकस्ड फंड या फंड प्रकारात ‘सेबी’च्या नियमानुसार कमाल ३० समभागांत गुंतवणूक करणे आवश्यक असल्याने निधी व्यवस्थापक काळजीपूर्वक समभागकेंद्रित पोर्टफोलिओ तयार करतात. फोकस्ड फंड या फंड प्रकाराच्या या वैशिष्टय़ामुळे समभाग एकाग्रतेचा धोका अधिक असतो. फंडाच्या पोर्टफोलिओत निवडक समभागांची मात्रा अधिक असल्याने एखाद्या समभागाच्या किमतीत घसरण झाल्यास पोर्टफोलिओची कामगिरी खालवण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडलेल्या समभागांचे पोर्टफोलिओत प्रमाण निश्चित करतानाच जोखीम आणि परतावा यांच्यात समतोल साधावा लागतो.

म्युच्युअल फंडाच्या ‘सेबी’च्या वर्गीकरणानंतर ‘अल्फा’ तयार करण्याची (संदर्भ मानदंडाहून अधिक परतावा) क्षमता या फंड प्रकारात जास्त आहे. म्हणूनच परंपरावादी जोखीमांक असलेले गुंतवणूकदार वगळता, जोखीम आणि परताव्याचा समतोल साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना तुलनेने अस्थिर, परंतु अधिक परताव्यासाठी या फंडाचा विचार करता येईल. अधिक जोखीम स्वीकारण्याची तयारी आणि क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांची या फंड प्रकाराला म्हणूनच पसंती राहते .

समभाग गुंतवणुकीसाठी निवडलेल्या फंडापैकी फोकस्ड फंडांची मात्रा एकूण समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या १० टक्क्यांहून अधिक असू नये. जोखीम विकेंद्रीकरणाच्या आणि परताव्यात वाढ होण्याच्या उद्देशाने ही विविधता आणली पाहिजे.

फोकस्ड फंडातील गुंतवणूक एकदा तुम्ही गुंतवणूक केली की गुंतवणूक सुरू राहील असे नसून अधूनमधून फंडांची कामगिरी तपासावी लागते. वेळेअभावी किंवा अन्य कारणांनी गुंतवणूकदारांना हे शक्य नसल्यास फोकस्ड फंडात गुंतवणूक करणे टाळलेले बरे. एका वर्षांच्या कामगिरीच्या बळावर दीर्घकालीन वित्तीय ध्येये साध्य करणारे साधन म्हणून निवड करणे योग्य नव्हे.

सध्या एल अँड टी फोकस इक्विटी फंड , किंवा axis focused फंड चांगला परतावा देत आहे !!

यामध्ये आपणास गुंतवणूक करावयाची असल्यास शेअरखान सावंतवाडी येथे संपर्क करावा !!

अभिप्राय द्या!