खाजगी क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेने ‘एमसीएलआर’ आधारित कर्जांच्या व्याजदरांमध्ये पाच ते दहा बेसिस पॉइंट्सने (०.०५ ते ०.१ टक्का) कपात केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली असून, घटलेले नवे दर तातडीने म्हणजे गुरुवार, सात नोव्हेंबरपासून अंमलात आले आहेत.