मोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना प्रामुख्याने तुमच्या गरजा लक्षात घेण्याची गरज आहे.

अ‍ॅड-ऑन कव्हर : प्रत्येक वेळी पॉलिसीचे नूतनीकरण करताना, अ‍ॅड-ऑन कव्हरविषयी विमा कंपनीकडे विचारपूस करणे श्रेयस्कर ठरेल. काही फेरबदलही केले जाऊ शकतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही नियमित पूर येणाऱ्या क्षेत्रात राहात असाल, तर तुम्हाला गाडीच्या इंजिनला हायड्रोस्टॅटिक लॉकमुळे पोहचू शकणाऱ्या नुकसानीपासून वाचण्याच्या वैशिष्ट्यांचा अंतर्भाव करून अतिरिक्त संरक्षण मिळविता येईल. झीरो डेप्रीसिएशन अथवा डेप्रीसिएशन शील्ड हे आणखी एक अ‍ॅड-ऑन कव्हर आहे, ते खरेदी करण्याची आवश्यकता आहे. नव्या वैशिष्ट्यांतर्गत, विमा उतरविणाऱ्या कंपनीला दाव्याच्या वेळी घसारा (डेप्रीसिएशन) लक्षात न घेता वाहनाच्या सुट्या भागाची त्या समयी असलेल्या बाजार भावाइतकी भरपाई करावी लागते. याला ‘बम्पर टू बम्पर कव्हर’ही म्हटले जाते.

ऐच्छिक वजावट : तुम्ही पूर्वीच्या मोटार विमा पॉलिसीमध्ये ऐच्छिक वजावटीचा (voluntary deductible) पर्याय निवडला नसेल, तर त्या वैशिष्ट्याचा तुम्ही पॉलिसीचे नूतनीकरण करताना अंतर्भाव करू शकता. या वैशिष्ट्यानुसार, विशिष्ट दुरूस्तीसंबंधी दाव्याच्या प्रसंगी स्वेच्छेने काही रक्कम भरण्याचा पर्याय निवडते; ज्यायोगे आपोआपच हप्त्याची रक्कम कमी होऊ शकते. तुम्ही निर्धारीत केलेल्या मर्यादेपलीकडे होणाऱ्या खर्चाची भरपाई मात्र विमा कंपनीच करते.

 अपवाद जाणून घ्या : मोटार विमा पॉलिसी दस्तामध्ये पॉलिसीची वैशिष्ट्ये आणि अपवाद केलेल्या गोष्टींचा तपशील असतो. विमाधारक या नात्याने पॉलिसीत कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि कोणत्या वगळल्या गेल्या आहेत समजून घेणे खूपच महत्वाचे आहे. दस्तात वापरात आलेल्या संज्ञांचा अर्थ विचारून आपण याची सुरुवात करू शकता. जरी प्रारंभीच तुम्हाला हे करता आले नसेल, तर पॉलिसीचे नूतनीकरण करताना तरी हे अपवाद घटक जाणून घ्या. कारण दावा करतेसमयी ते कोणी लक्षात आणून दिल्यास खूप उशीर झालेला असेल. पुढील पॉलिसी कालावधीसाठी आपल्याला जर विशिष्ट मान्यता हव्या असतील असेल तर अतिरिक्त प्रीमियम भरून आपण त्यांचा अंतर्भाव करण्यासाठी विनंती करू शकता.

 तंत्रज्ञानात्मक प्रगती : तंत्रज्ञानात निरंतर होत असलेल्या प्रगतीनुरूप, आजकाल विमा कंपन्या स्मार्टफोनद्वारेच विम्याचे दावे नोंदविण्याची आणि त्यांच्या निवारणाची सुविधा उपलब्ध केली आहे. ही दावे प्रक्रिया अत्यंत वेगवान आहे आणि काही फोटो आणि व्हिडीओच्या मदतीने विशिष्ट रकमेपर्यंतचे दावे हे अगदी २० मिनिटांमध्ये निवारता येतात. तुमच्या विमा कंपनीने अशी कोणती सुविधा बहाल केली आहे हे तपासून घ्या. कारण दाव्याच्या प्रक्रियेत जाणारा वेळ त्यातून कमी करता येईल. तुमच्या पसंतीची विमा कंपनी निवडताना, तिच्या प्रथा-प्रक्रियाही एकदा नक्कीच तपासून घ्या.

नो क्लेम बोनस : आधीच्या वर्षी कोणताही दावा दाखल न केल्याचे इनाम या रूपात विमा कंपनी तुम्हाला ‘नो क्लेम बोनस’ पॉलिसी नूतनीकरणाच्यावेळी देत असते. या बोनस अर्थात बक्षिसीचे प्रमाण हे तुम्हाला पडणाऱ्या विमा हप्ता रकमेच्या २० ते ५० टक्क्यांदरम्यान काहीही असू शकते. विमाधारकाला सुरक्षितपणे, अपघाताविना गाडी चालविण्याचा, पर्यायाने कोणताही दावा दाखल करण्याचे हे कंपनीने दिलेले बक्षीसच असते. जरी तुम्ही पुढल्या वर्षी विमा कंपनी बदलण्याचे ठरविले तरी हे एनसीबी लाभही हस्तांतरीत केले जातात. त्यासाठी तुम्हाला विद्यमान विमा कंपनीकडून त्यासंबंधीचे एक प्रमाणपत्र मात्र मिळवावे लागेल.

मुदत संपण्याआधी नूतनीकरण : मोटार विमा पॉलिसीच्या मुदत समाप्तीआधी तिचे नूतनीकरण करणे ही मूलभूत महत्वाची गोष्ट आहे. पॉलिसीची मुदत संपून ९० दिवस उलटल्यास, तुम्हाला नो क्लेम बोनसचे लाभ मिळविण्याची पात्रताही संपुष्टात येईल. म्हणूनच विद्यमान पॉलिसीची मुदत संपण्याच्या खूपच आधीच पॉलिसीचे नूतनीकरण करणे श्रेयस्कर ठरते. किमतीच्या घटकावर अतिरिक्त भर न देता, तुमच्या मोटारीच्या संरक्षणाच्या सर्व गरजांची पूर्तता करणारे विम्याचे कवच मिळविले जाईल, याची खातरजमा करा. शिवाय, दावे निवारणाचा पूर्वलौकिक चांगला आहे हे तपासूनच सुयोग्य विमा कंपनीची निवडही महत्वाचीच!

अभिप्राय द्या!