टाटा अॅसेट मॅनेजमेंटने नवा इक्विटी फंड बाजारात आणला आहे. ‘टाटा फोकस्ड इक्विटी फंड’ असे या नव्या म्युच्युअल फंड योजनेचे नाव आहे. हा एक ओपन एंडेड प्रकारातील फंड आहे. या फंडाद्वारे कमाल 30 कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा एक मल्टीकॅप प्रकारातील फंड आहे. विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये या फंडाद्वारे गुंतवणूक केली जाणार आहे.
टाटा फोकस्ड इक्विटी फंडासाठी एस अॅंड पी बीएसई 200 टीआरआय हा बेंचमार्क असणार आहे. नव्या ‘टाटा फोकस्ड इक्विटी फंडाचे व्यवस्थापन रुपेश पटेल करणार आहेत. हा एनएफओ (न्यू फंड ऑफर) 15 नोव्हेंबरला गुंतवणूकीसाठी खुला होत असून 29 नोव्हेंबर 2019 ही त्याची अंतिम मुदत आहे.
 
या फंडाद्वारे बाजारातील विविध क्षेत्रातील आणि विविध बाजारमूल्याच्या उत्तम कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या फंडाचा पोर्टफोलिओ बॉटम अप पद्धतीने उभारला जाणार आहे. कंपन्यांची मूलभूत स्थिती आणि जोखमीच्या तुलनेत परतावा देण्याची क्षमता या आधारावर गुंतवणूक केली जाणार आहे.

अभिप्राय द्या!