एलआयसी हाऊसिंग फायनान्सने चालू आर्थिक वर्षात 55,000 कोटी रुपये कर्जवितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. वरिष्ठ सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लि.ने मागील आर्थिक वर्षात 48,000 कोटी रुपयांचे केले आहे. दोन दिवसीय मेगा प्रॉपर्टी फेअरच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समजली आहे. यावर्षी आतापर्यत कंपनीने 26,000 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे.
कंपनीच्या एकूण थकित कर्जात मागील वर्षाच्या तुलनेत सुधारणा करण्याचेही एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे उद्दिष्ट आहे. सध्या हे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. स्वस्त घर योजनेमुळे गृहनिर्माण क्षेत्रात हळूहळू सुधारणा होत आहे . प्रधान मंत्री आवास योजनेचा एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या पोर्टफोलिओमधील वाटा 26 टक्के इतका आहे. 25 ते 35 वर्षे वयोगटातील नागरिकांकडून घर विकत घेण्यासाठी गृहकर्जाला मोठी मागणी असते .
जे ग्राहक एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या गृहकर्जासाठी 30 नोव्हेंबरच्या आधी अर्ज करणार आहेत आणि ज्यांचे गृहकर्ज 31 डिसेंबर 2019 पर्यत त्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यांना प्रोसेसिंग फी किंवा प्रक्रिया शुल्काची रक्कम परत मिळणार आहे.