कर्ज संकटात असलेली सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडिया आणि इंधन वितरक कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) मधील सरकारी मालकी कमी करण्यासंदर्भात मार्च 2020 पर्यंतचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
 
एअर इंडिया या सरकारी विमानसेवा कंपनीतील आपला हिस्सा विकून या कंपनीला पुनरूज्जीवन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. 
 
दुसरीकडे बीपीसीएलमधील सरकारी हिस्साही कमी करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. या अगोदर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे देखील खासगीकरण संदर्भातील बातम्या समोर आल्या आहेत. या दोन्ही व्यवहारातून सरकारला एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न होईल असे अपेक्षित आहे. राजकोषीय तूट आवाक्यात ठेवणे आणि निर्गुंतवणूकीचे उद्दिष्ट गाठणे असा दुहेरी हेतू साध्य करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. 

अभिप्राय द्या!