कर्जाच्या समस्येत अडकलेल्या एस्सार स्टीलला अर्सेलर मित्तलने खरेदीसाठी केलेल्या दाव्यावर सर्वोच्च नायालयाने शिक्कामोर्तब केल्याने एसबीआयने सुटकेचा निश्वास टाकला आहे. या निकालामुळे एसबीआयचे 13,226 कोटी मोकळे होणार आहेत. आलेली रक्कम बँकेच्या ‘नफा -तोटा’ खात्यावर जाणार असल्याने चालू तिमाहीत बँकेच्या नफ्यात मोठी वाढ होणार असल्याचे एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. यानंतर बँकेच्या शेअरमध्ये मोठी तेजी दिसून आली. दिवसाच्या शेवटी बॅंकेचा शेअर 324.95 वर बंद झाला.
आरबीआयने 2017 मध्ये जाहीर केलेल्या मोठ्या थकीत कर्ज प्रकरण यादीत एस्सार स्टीलचा समावेश होता. कंपनीवर तब्बल 49 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. परिणामी कंपनीच्या दिवाळखोरी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये एसबीआयचा वाटा सर्वाधिक आहे.
प्रसिद्ध उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांच्या अर्सेलर मित्तलने एस्सार स्टीलला 42 हजार कोटींना खरेदी केले आहे. तसेच पुढील वर्षी ते कंपनीत 8 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत.

 

अभिप्राय द्या!